Saturday, February 24, 2018

"गुलाबजाम"


 मित्रांनो... तुम्हाला एक अतिशय सुंदर दृकश्राव्य अनुभव हवाय का?

नक्की जाऊन "गुलाबजाम" हा सिनेमा पहा...
बऱ्याच जणांनी केलेली सोनाली कुलकर्णीची तारीफ, आणि एकंदर या चित्रपटाचं होतं असलेलं कौतुक... असे अनेक घटक मला हा सिनेमा पहाण्यासाठी ढकलत होते... म्हणून मी आणि सौ. नी जाऊन हा सिनेमा आज पाहिला.

सुरवात ज्या धावपळीत होते, तोच वेग कायम ठेवत हे छोटंसं कथानक पुढे सरकत राहतं; आणि तुम्ही मात्र आपल्याच विश्वात त्या कथानकाला गुंफत कुठे तरी हरवून जाताय, असा माझा वैयक्तिक अनुभव होता.

तुमच्या घरापासून, आईपासून दूर कुठे तरी मिळेल ते खाल्लंय का तुम्ही?
उत्तर "हो" असेल... आणि तुम्ही FOODIE म्हणजेच खवय्ये (इन्स्टा वरचे नाही बरं का) असाल तर हा तुमचा चित्रपट आहे, हे नक्की समजा!!!

सिनेमाची समिक्षा लिहिण्याचा माझा मानस नक्कीच नाहीये; पण जे मला अनुभवता आलं, ते तुम्हा सर्वांन पर्यंत पोहोचवावं म्हणून हा खटाटोप.

सुरवातीलाच कुठे तरी "थैकुंडं ब्रिज" चा उल्लेख दिसला, नक्की कळत नाहीये त्यांनी संगीत दिलंय का नाही या बद्दल... पण Background Music अतिशय प्रभावी झालंय, ते चित्रपटामध्ये खूप छान मिसळून सुद्धा गेलंय.

मी स्वतः चित्रपट पहाताना मला त्यात खूप छान फ्रेम्स दिसतातं, बहुतेक मी तसं पाहतो असा म्हणावं लागेल... चित्रपटाची फोटोग्राफी अतिशय सुंदर आहे, आणि ती जाणवायला तुम्ही फार मोठं कला समीक्षक वगैरे असावं लागणार नाहीये इतकं सहज सुंदर झालंय सगळं.

कथानक प्रभावी नसताना सुद्धा, कलाकारांनी चित्रपटाला नक्कीच प्रभावी केलंय; कुठलीच गोष्ट हि खटकतेय अशी वाटणारी नाहीये.

आम्हा दोघांच्या प्रतिक्रिया अग्गदी सारख्याच होत्या... चित्रपटात एका ठिकाणी छान पाऊस पडतो, त्या क्षणापर्यंत तो पाऊस तुमच्या डोळ्यात पण दाटला असेल(?) तर त्याला मोकाट बरसू द्या... खूप मस्त वाटेल...

एक खास गुलाबजाम आहे चित्रपटात, जो सोनाली उचलते आणि त्याचा पाक-थेंब खाली भांड्यात पडतो त्याचा सुद्धा आवाज आहे... तो टिपण्यासारखा आहे.

एकंदर सगळं उत्तम, आणि पैसावसूल आहे... म्हणून हा गुलाबजाम नक्कीच खा!

टीप : वेळे अभावी आणि आमच्या दुर्दैवाने आम्ही अतिशय भंगार ठिकाणी हा चित्रपट पाहिला, पण तुम्ही जिथे उत्तम ध्वनी व्यवस्था असेल अश्याच सिनेमागृहात हा चित्रपट बघा!!!

* मला कोणीही या प्रोमोशनसाठी पैसे दिलेले नाहीयेत!!!

Tuesday, April 2, 2013

अनपेक्षित...

आमचा एक CLIENT एका अलिशान बिल्डींग मध्ये आहे... त्यात प्रवेश करण्या आधी आपलं ओळखपत्र जमा करून एक पास घ्यावा लागतो... आणि तो जिथे मिळतो त्या डेस्क वर एक गोऱ्या बाई (फक्त वर्णाने न्हवे; तर संदर्भाने सुद्धा...) असतात.

आत्ता पर्यंतचा अनुभव पाहता तिथे स्मित-हास्यासह सेवा मिळत नाही; आणि त्यांच्या मुद्रे वरील एकंदर भाव पहाता... शहाण्याने तरी तशी अपेक्षा करू नये! ;)

आज पण मी तिथेच गेलो होतो... बिल्डिंग काचेची असल्यामुळे मी बाहेरूनच डेस्क वर कोण आहे... याचा अंदाज घेत; आत शिरलो.

सवयी प्रमाणे मला घाम येतच असतो (सदा सर्वदा...) आज ही थोडा फार आला असावा!

मी माझं ओळखपत्र दिलं; आणि पास घेऊन माझी bag उचलत होतो... तोवर परत एक आवाज ऐकू आला... 'Sir... Please take this'... आणि काय आश्चर्य... डेस्क-लेडी आज मला चक्क टिशू पेपर देत होत्या!!!

लिफ्ट मध्ये जाऊन मी आधी आरशात माझं तोंड पाहिलं... फारसा घाम तर आला नव्हताच... आणि मी सुद्धा नेहमी सारखाच दिसत होतो ;)

अपेक्षित नसताना असं काही घडणं; फार सुखावह असतं हे नक्की!!! ;) :)

हाभार्स... गोरे बाई!!! ;)

Tuesday, April 17, 2012

None of my Bussiness!!!

I was traveling to my office by Metro… and reading was on my plan… since I was carrying a very nice book “Asa Mi Asami” of Mr. P L Deshpande... While finding for a vacant seat; I ended up seating in front of one lady… She was dressed like someone from the fashion world… I can’t understand these Dress Designer people… They design cloths with Centimeter and Millimeter long clothes and they cover themselves with turtle necks and enough long dresses to sweep the streets... What the heck!!! :-o

So that lady was wearing something same which was covering her from neck to toe and the color was matching her skin tone too… Black!!!… Sorry guys I am not racist!!! But the truth is what I am talking :)

I was trying to concentrate on the book in my hand and that lady was talking enough loudly that the person seating 2 rows next to us can hear her “loud and clear”… She was talking some business and that was NONE OF MINE :P

After a while she mention on phone that she will text something from her “BlackBerry” to the person next to her on call… Wowww Aunty got a BlackBerry toooo :P ;)

Now she start texting and all of a sudden she recalled to call someone again… She took the phone out from her very nice "Chanel" purse and the person next to her was something called……… Hmmmmmmmm... Dhruv!!!

See I remember the name as well… How clever I am!!! & what a lovely name guys… Dhruv… Wah Wah!!! :)

The conversation was regarding some assignments given to this Mr. Dhruv and he was not replying our Auntiji… and our pissed off Auntiji was talking like… “Dhruv please don’t make me feel so Latkaued….” Ohhhhhhhhhhh this was the point to get turn on… mind my word here and don’t be nasty… I mean to say that I have completely lost my attention from equally interesting book and I start paying attention to our Auntiji :D

Auntiji was so horrible… and with the attire she was carrying… She was looking no where less horrible than some Witch in the fairy-tales... But the most amazing thing was the word "Latkaued..." woowwwwwww new addition in my diction!!! :D

By any chance if she is having any husband… looking at her age guys... adjust!!! and her lingo “Latkaued…” it could be easily possible that she must be Indian + Mumbaite too and must be married as well by this age… So coming to the point… My unspoken request to her… that She should never try to wake her husband up from the sleep at any given time of the day… and plus with the same color lip-stick applied (the Bright Pink color lipstick she applied before getting down from the Metro!!!)… I can bet any bloody thing in the world for the 200% chance of getting a mild heart attack if anyone sees her right after opening the eyes out of a deep sleep… A Sleep forever guaranteed!!! :P

This all shit going on my mind was "None of my business"… but so many times we stick to do the same and others keep doing the same about Us… after all we all are Human beings… Same nature with lil differences!!! :P

But this “None of My Bussiness” gave me a good TP over my Metro ride! ;) :)



P.S. -: "Latkaued" is a Hindi word modified as a English verb in "Hinglish" (Hindi + English)... Means roughly something like... "Kept waiting clueless by someone (without any reply or update)" :) ;) :P :D














Image courtesy : www.Google.com

Friday, September 23, 2011

योग... योगायोगातला!!!

आज 23.09.2011; दुबई मध्ये महाराष्ट्र मंडळ दुबई यांनी "मानाचा मुजरा" हा कार्यक्रम आयोजित केला होता. मी मंडळाचा सभासद नाही तरीही मला या कार्यक्रमाची माहिती Bombay Bites च्या पाटणे काकांनी दिली होती आणि मुख्य म्हणजे सभासदां प्रमाणेच सर्वांसाठी प्रवेश विना मूल्य होता :)
कार्यक्रमा मध्ये प्रसिद्ध इतिहासकार श्री बाबासाहेब पुरंदरे येणार होते आणि मला तर त्यांना पहायची जाम इच्छा होती... मुळात त्यांचा फोटो काढणे हा मुख्य हेतू होता :P
सकाळ पासून मी मला कोण कंपनी देऊ शकेल याचा कानोसा घेत होतो... Lunch मध्ये Sarang ला विचारून पाहिलं असता तो तयार झाला होता... पण मला शंका होतीच... 6:15 PM चा प्रोग्राम म्हणजे 5 ला निघू असं ठरवून आम्ही आराम करायला निघून गेलो... मी 4:30 ला जाऊन सारंग चा अंदाज घेतला... राजे डोकं पकडून बसले होते... आणि आता मात्र मी एकटा जाणार हे निश्चित झालं होत :(

मला तयार होऊन बाहेर पडायला 5:15 झाले होते आणि (मनगटावर घड्याळ बांधून सुद्धा) आपल्या हातात नसलेली वेळ निघून जाते आहे ते पाहत मी विचार करत होतो कि जायचं कसं??? शेवटी वेळ कमी असून सुद्धा मी METRO ने जायचा plan नक्की केला... काकांनी सांगितल्या प्रमाणे स्टेशन गाठल; आणि मी तिथे असलेल्या एका स्टेशन Assistance ला address विचारला... आपल्याकडे शांतपणे, "माहित नाही किंवा दुसऱ्या कोणाला विचारा" असं सांगून ज्याने सहज आपली बोळवण करावी... तिथे हा माणूस शांतपणे दुसय्रा एका कोटवाल्याकडे गेला आणि त्याने त्याला address विचारला... सवयी प्रमाणे AC मध्ये फिरून सुद्धा घामाने ओलाचिंब झालेला मी पाहून ते पण जरा विचारात पडले असावे... त्या कोटवाल्याने लगेच mobile काढून एक call केला आणि दुसय्रा एका मदतनीसाला बोलावलं... हा माणूस पण त्या स्टेशन मध्ये जवळच कुठे तरी असावा.... तो लगेच आला आणि त्याने तो address + map हातात घेऊन मला हा address, actually 1 स्टेशन मागे असावा असं सांगितलं... त्याला पण ते नीटसं माहित नसावं... हे आदरातिथ्य पाहून मला आता खरच त्या सर्वांना वाकून नमस्कार वगैरे करावा का... असं वाटलं होतं... पण आश्चर्याचे धक्के इथेच संपले नव्हते...
जवळ जवळ कार्यक्रमाचा वेळ होत आलेला आणि मी पत्ता शोधात नक्की किती दूर उभा होतो हे कळायला मार्ग नव्हता... मी आता TAXI कडे माझा मोर्चा वळवला... TAXI मिळाली मी TAXI मध्ये बसलो... आता गडबडीत असलेला माणूस कितीही फर्ड इंग्रजी बोलत असला तरीहि आपल्या मातृभाषेवर घसरतो असं म्हणतात... आणि जर तो माणूस "मुंबईकर" असेल तर तो फार फार तर हिंदी वर घसरतो... (मी जात्याच... अहं!!! जन्मताच मुंबईकर आहे... हे मी सिद्ध केलं...) मी एकदा TAXI DRIVER च्या तोंडाकडे पहिल आणि त्याला हिंदीत विचारलं "एमिरातेस इंग्लिश स्कूल मालूम ही क्या आपको???"... आणि माझा map वाला कागद पुढे केला... त्याने तो एकदा नीट पहिला आणि लगेच एक call लावला... आपल्या पश्तू उर्दू मध्ये त्याने पलीकडे पत्ता विचारायचा प्रयत्न केला असावा असं मी अंदाज लावला... "इसको कहा जाके मारू" असं काही त्याने विचारलं नाही हे नक्की :D

इथे सांगणं गरजेचं वाटतय कि इतकं होईतोवर TAXI जागीच होती आणि METER सुरु झालेला नव्हता! (चालू म्हणणं बरं दिसत नाही इथे!)... या महाशयांनी call बंद केला... आणि "इस #@$%@!% को 13 साल हुये दुबई मै TAXI चला राहा है.... उसको भी मालूम नाही है साब... आप वो RED color वाला TAXI पकडो उसमे GPS शुरू होता है... वो ‘Government TAXI' है…" असं खुलासा करत मला उतरण्याची विनंती केली... मी विचार करत होतो... इतर ठिकाणी इतक्यात METER सुरु झाला असता आणि मी रस्ता माहित नसताना सुद्धा भ्रमंती करत शेवटी double bill देऊन उतरलो असतो... Amazing Experience… अहो आश्चर्यम!!! :)

आता माझा patience संपत आला होता नी मी परत METRO स्टेशन मध्ये घुसून त्याचा दुसर्या बाजूला जायला निघालो होतो... वाटेत परत एका व्यक्तीला पत्ता विचारताच... त्यांनी एकदम विश्वासाने मला हात दाखवून सांगितलं... "वो दिखता है न वोही बिल्डिंग है..." वाह!!! आता मी पटापट चालून ती बिल्डिंग गाठली सुद्धा ते SCHOOL पण होत; पण जे मला हवं होतं नेमकं ते SCHOOL नव्हतं... परत थोडा चालून मी आता Shaikh Zayed Road वर आलो होतो... इथे TAXI मिळणं किती कठीण आहे ते मला माहित असून पण Hopes जाम होते... आणि चक्क मला एक RED Taxi मिळाली... त्याने मला एकदम perfect location ला नेऊन सोडल आणि खरच मी 2 स्टेशन्स पुढे निघून आलो होतो... जेव्हा मला 2 स्टेशन आधी उतरायला हवं होतं... कार्यक्रम सुरु होऊन काही मिनिटे झाली असावी.... Stall फुल आणि Balcony मात्र फुल खाली होती... मस्त... मला पुढची सीट मिळाली होती.

स्वतंत्र वीर सावरकर ह्यांची नात सौ. विनता जोशी आणि सहकरी यांचे पोवाडे सुरु होते... काही पोवाडे त्या खरंच छान गायल्या... झांशी च्या राणी वरचा पोवाडा तर इतका छान होता की वर्णन करता येणार नाही... रायगडावर झालेल्या त्रिशतकोत्तर रौप्य महोत्सवात "शाहिरी रात्र" या कार्यक्रमासाठी अनेक पुरुष शाहीरांबरोबर आमंत्रित करण्यात आलेल्या या एकमेव महिला शाहीर आहेत... त्यांचं पोवाडा गायन संपलं आणि बाबासाहेबांचं व्याख्यान सुरु झालं...

व्याख्यानं सुरु करतानाच त्यांनी एक माहिती दिली की... त्यांच्या स्वर कोशाला काही इजा झाली आहे... त्यामुळे हे त्यांचं कदाचित शेवटचं व्याख्यानं असेल... ऐकून फार दुख झालं... पण मी तिथे आहे आणि मी त्यांना प्रत्यक्ष ऐकणार आहे हि कल्पना फार सुखद होती... आणि खरोखर शाळेत असताना इतिहास मध्ये भोपळे खाणारा मी... (शब्दशः अर्थ घेऊ नये!!!) इतकं शांतपणे सगळं ऐकत होतो... कारण एकच होता समोर बसलेली व्यक्ती आणि त्यांचा अभ्यास आणि ते ज्या प्रकारे वर्णन करतात... रंगमंचावर फक्त एक खुर्ची आणि त्या वर बसलेले ९२ वर्षांचे बाबासाहेब असताना सुद्धा; तुम्हाला 3D पेक्षा जास्त गहिरा अनुभव मिळत असतो... आपल्याला ते जाणीव करून देतात की काय झालं होतं... कसं झालं होतं... कुठे झालं होतं आणि नेमकी तारीख वेळ काय होती सारं सारं संदर्भासहित!!! हे पाहण्याचा मला योग आला हा किती मोठा योगायोगच नव्हता का??? :)

ते मंतरलेले तास संपले; कार्यक्रम संपला आणि आता कार्यक्रमाची सांगता होणार हे जाणून मी खाली गेलो कारण वरून किती फोटो काढले तरी माझा Cam आणि मी थकलो नव्हतो... मला अजून Close फोटो हवे होते... मी फोटो काढण्यात मग्न असताना माझा Mobile वाजतोय या कडे मी मुद्दामून दुर्लक्ष करत होतो... आणि काही Clicks नंतर मी Phone काढून पहिला... तर चक्क माझी Facebook मैत्रीण Akshata Haryan मला Call करत होती... दुबई मध्ये येऊन जुनी झालेली पण मला अद्याप न भेटलेली माझी हि मैत्रीण मला चक्क आज का Call करते आहे म्हणून मी तिला Call back केला.... तो Answer न करता तिचाच परत call आला... "फोटो कडून झाले असतील... तर जरा बाहेर पण ये... मी पण आहे इथेच..." It was a surprise... पण मला मात्र 70-300 बदलून 18-55 वर काही close-ups हवे होते... गडबडीत मी lens change वगैरे करून काही Photos घेतले सुद्धा पण तोवर माझी मैत्रीण मात्र गायब झाली होती... कदाचित तिला भेटणं आज नशिबात नसावं... आणखी एक योगायोग!!! :)

आता हे सगळं संपेपर्यंत 11 वाजले होते... मला जाऊन जेवता येतील अशी सगळी ठिकाण बंद झालेली असणार हे नक्की होतं... पण आज Friday असल्याने METRO अजून सुरु होती... आता मी McD मध्ये थोडा Junk फूड पोटात ढकलून घरी निघालो होतो... दिवस छान संपला होता आणि हा माझा आता पर्यंतचा बेस्ट वीकेंड असेल असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही... मी सगळ्या गडबडीत माझी भूक सुद्धा विसरलो होतो... घरी पोहोचताच माझी नजर दरवाजात असलेल्या टिफीन कडे गेली... टिफीन अक्षय पाटील चा होता... शारजाह ला गेलेला अक्षय अजून घरी आलेला नाही हे त्या वरून कळत होतं... पण मी त्याला call करून confirm केलं... आणि त्याचा टिफीन खाण्याची परवानगी पण मिळवली... नाहीतर 12:20 ला मला कोण Dinner घेऊन येणार होतं म्हणा... 8 वाजता येणारा हा टिफीन; 12 वाजे पर्यंत रूममेट्स पैकी कोणीही सहज उचलून ठेवणं शक्य होतं... आणि तसं झालं असतं तर मी तो शोधायला जाण शक्यच नव्हतं... कारण तो माझ्यासाठी आलेलाच नव्हता ना... तो तिथेच राहिला म्हणून... बरं झालं!!! Again one योगायोग… :D ;) :)

- Santosh Kudtarkar 24.09.2011 / 03:00 AM


 कार्यक्रमातील काही मी टिपलेली क्षणचित्रे -: (All rights to publish and copying the content is reserved to "Santosh_kudtarkar@yahoo.co.in | Photography")