Friday, September 23, 2011

योग... योगायोगातला!!!

आज 23.09.2011; दुबई मध्ये महाराष्ट्र मंडळ दुबई यांनी "मानाचा मुजरा" हा कार्यक्रम आयोजित केला होता. मी मंडळाचा सभासद नाही तरीही मला या कार्यक्रमाची माहिती Bombay Bites च्या पाटणे काकांनी दिली होती आणि मुख्य म्हणजे सभासदां प्रमाणेच सर्वांसाठी प्रवेश विना मूल्य होता :)
कार्यक्रमा मध्ये प्रसिद्ध इतिहासकार श्री बाबासाहेब पुरंदरे येणार होते आणि मला तर त्यांना पहायची जाम इच्छा होती... मुळात त्यांचा फोटो काढणे हा मुख्य हेतू होता :P
सकाळ पासून मी मला कोण कंपनी देऊ शकेल याचा कानोसा घेत होतो... Lunch मध्ये Sarang ला विचारून पाहिलं असता तो तयार झाला होता... पण मला शंका होतीच... 6:15 PM चा प्रोग्राम म्हणजे 5 ला निघू असं ठरवून आम्ही आराम करायला निघून गेलो... मी 4:30 ला जाऊन सारंग चा अंदाज घेतला... राजे डोकं पकडून बसले होते... आणि आता मात्र मी एकटा जाणार हे निश्चित झालं होत :(

मला तयार होऊन बाहेर पडायला 5:15 झाले होते आणि (मनगटावर घड्याळ बांधून सुद्धा) आपल्या हातात नसलेली वेळ निघून जाते आहे ते पाहत मी विचार करत होतो कि जायचं कसं??? शेवटी वेळ कमी असून सुद्धा मी METRO ने जायचा plan नक्की केला... काकांनी सांगितल्या प्रमाणे स्टेशन गाठल; आणि मी तिथे असलेल्या एका स्टेशन Assistance ला address विचारला... आपल्याकडे शांतपणे, "माहित नाही किंवा दुसऱ्या कोणाला विचारा" असं सांगून ज्याने सहज आपली बोळवण करावी... तिथे हा माणूस शांतपणे दुसय्रा एका कोटवाल्याकडे गेला आणि त्याने त्याला address विचारला... सवयी प्रमाणे AC मध्ये फिरून सुद्धा घामाने ओलाचिंब झालेला मी पाहून ते पण जरा विचारात पडले असावे... त्या कोटवाल्याने लगेच mobile काढून एक call केला आणि दुसय्रा एका मदतनीसाला बोलावलं... हा माणूस पण त्या स्टेशन मध्ये जवळच कुठे तरी असावा.... तो लगेच आला आणि त्याने तो address + map हातात घेऊन मला हा address, actually 1 स्टेशन मागे असावा असं सांगितलं... त्याला पण ते नीटसं माहित नसावं... हे आदरातिथ्य पाहून मला आता खरच त्या सर्वांना वाकून नमस्कार वगैरे करावा का... असं वाटलं होतं... पण आश्चर्याचे धक्के इथेच संपले नव्हते...
जवळ जवळ कार्यक्रमाचा वेळ होत आलेला आणि मी पत्ता शोधात नक्की किती दूर उभा होतो हे कळायला मार्ग नव्हता... मी आता TAXI कडे माझा मोर्चा वळवला... TAXI मिळाली मी TAXI मध्ये बसलो... आता गडबडीत असलेला माणूस कितीही फर्ड इंग्रजी बोलत असला तरीहि आपल्या मातृभाषेवर घसरतो असं म्हणतात... आणि जर तो माणूस "मुंबईकर" असेल तर तो फार फार तर हिंदी वर घसरतो... (मी जात्याच... अहं!!! जन्मताच मुंबईकर आहे... हे मी सिद्ध केलं...) मी एकदा TAXI DRIVER च्या तोंडाकडे पहिल आणि त्याला हिंदीत विचारलं "एमिरातेस इंग्लिश स्कूल मालूम ही क्या आपको???"... आणि माझा map वाला कागद पुढे केला... त्याने तो एकदा नीट पहिला आणि लगेच एक call लावला... आपल्या पश्तू उर्दू मध्ये त्याने पलीकडे पत्ता विचारायचा प्रयत्न केला असावा असं मी अंदाज लावला... "इसको कहा जाके मारू" असं काही त्याने विचारलं नाही हे नक्की :D

इथे सांगणं गरजेचं वाटतय कि इतकं होईतोवर TAXI जागीच होती आणि METER सुरु झालेला नव्हता! (चालू म्हणणं बरं दिसत नाही इथे!)... या महाशयांनी call बंद केला... आणि "इस #@$%@!% को 13 साल हुये दुबई मै TAXI चला राहा है.... उसको भी मालूम नाही है साब... आप वो RED color वाला TAXI पकडो उसमे GPS शुरू होता है... वो ‘Government TAXI' है…" असं खुलासा करत मला उतरण्याची विनंती केली... मी विचार करत होतो... इतर ठिकाणी इतक्यात METER सुरु झाला असता आणि मी रस्ता माहित नसताना सुद्धा भ्रमंती करत शेवटी double bill देऊन उतरलो असतो... Amazing Experience… अहो आश्चर्यम!!! :)

आता माझा patience संपत आला होता नी मी परत METRO स्टेशन मध्ये घुसून त्याचा दुसर्या बाजूला जायला निघालो होतो... वाटेत परत एका व्यक्तीला पत्ता विचारताच... त्यांनी एकदम विश्वासाने मला हात दाखवून सांगितलं... "वो दिखता है न वोही बिल्डिंग है..." वाह!!! आता मी पटापट चालून ती बिल्डिंग गाठली सुद्धा ते SCHOOL पण होत; पण जे मला हवं होतं नेमकं ते SCHOOL नव्हतं... परत थोडा चालून मी आता Shaikh Zayed Road वर आलो होतो... इथे TAXI मिळणं किती कठीण आहे ते मला माहित असून पण Hopes जाम होते... आणि चक्क मला एक RED Taxi मिळाली... त्याने मला एकदम perfect location ला नेऊन सोडल आणि खरच मी 2 स्टेशन्स पुढे निघून आलो होतो... जेव्हा मला 2 स्टेशन आधी उतरायला हवं होतं... कार्यक्रम सुरु होऊन काही मिनिटे झाली असावी.... Stall फुल आणि Balcony मात्र फुल खाली होती... मस्त... मला पुढची सीट मिळाली होती.

स्वतंत्र वीर सावरकर ह्यांची नात सौ. विनता जोशी आणि सहकरी यांचे पोवाडे सुरु होते... काही पोवाडे त्या खरंच छान गायल्या... झांशी च्या राणी वरचा पोवाडा तर इतका छान होता की वर्णन करता येणार नाही... रायगडावर झालेल्या त्रिशतकोत्तर रौप्य महोत्सवात "शाहिरी रात्र" या कार्यक्रमासाठी अनेक पुरुष शाहीरांबरोबर आमंत्रित करण्यात आलेल्या या एकमेव महिला शाहीर आहेत... त्यांचं पोवाडा गायन संपलं आणि बाबासाहेबांचं व्याख्यान सुरु झालं...

व्याख्यानं सुरु करतानाच त्यांनी एक माहिती दिली की... त्यांच्या स्वर कोशाला काही इजा झाली आहे... त्यामुळे हे त्यांचं कदाचित शेवटचं व्याख्यानं असेल... ऐकून फार दुख झालं... पण मी तिथे आहे आणि मी त्यांना प्रत्यक्ष ऐकणार आहे हि कल्पना फार सुखद होती... आणि खरोखर शाळेत असताना इतिहास मध्ये भोपळे खाणारा मी... (शब्दशः अर्थ घेऊ नये!!!) इतकं शांतपणे सगळं ऐकत होतो... कारण एकच होता समोर बसलेली व्यक्ती आणि त्यांचा अभ्यास आणि ते ज्या प्रकारे वर्णन करतात... रंगमंचावर फक्त एक खुर्ची आणि त्या वर बसलेले ९२ वर्षांचे बाबासाहेब असताना सुद्धा; तुम्हाला 3D पेक्षा जास्त गहिरा अनुभव मिळत असतो... आपल्याला ते जाणीव करून देतात की काय झालं होतं... कसं झालं होतं... कुठे झालं होतं आणि नेमकी तारीख वेळ काय होती सारं सारं संदर्भासहित!!! हे पाहण्याचा मला योग आला हा किती मोठा योगायोगच नव्हता का??? :)

ते मंतरलेले तास संपले; कार्यक्रम संपला आणि आता कार्यक्रमाची सांगता होणार हे जाणून मी खाली गेलो कारण वरून किती फोटो काढले तरी माझा Cam आणि मी थकलो नव्हतो... मला अजून Close फोटो हवे होते... मी फोटो काढण्यात मग्न असताना माझा Mobile वाजतोय या कडे मी मुद्दामून दुर्लक्ष करत होतो... आणि काही Clicks नंतर मी Phone काढून पहिला... तर चक्क माझी Facebook मैत्रीण Akshata Haryan मला Call करत होती... दुबई मध्ये येऊन जुनी झालेली पण मला अद्याप न भेटलेली माझी हि मैत्रीण मला चक्क आज का Call करते आहे म्हणून मी तिला Call back केला.... तो Answer न करता तिचाच परत call आला... "फोटो कडून झाले असतील... तर जरा बाहेर पण ये... मी पण आहे इथेच..." It was a surprise... पण मला मात्र 70-300 बदलून 18-55 वर काही close-ups हवे होते... गडबडीत मी lens change वगैरे करून काही Photos घेतले सुद्धा पण तोवर माझी मैत्रीण मात्र गायब झाली होती... कदाचित तिला भेटणं आज नशिबात नसावं... आणखी एक योगायोग!!! :)

आता हे सगळं संपेपर्यंत 11 वाजले होते... मला जाऊन जेवता येतील अशी सगळी ठिकाण बंद झालेली असणार हे नक्की होतं... पण आज Friday असल्याने METRO अजून सुरु होती... आता मी McD मध्ये थोडा Junk फूड पोटात ढकलून घरी निघालो होतो... दिवस छान संपला होता आणि हा माझा आता पर्यंतचा बेस्ट वीकेंड असेल असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही... मी सगळ्या गडबडीत माझी भूक सुद्धा विसरलो होतो... घरी पोहोचताच माझी नजर दरवाजात असलेल्या टिफीन कडे गेली... टिफीन अक्षय पाटील चा होता... शारजाह ला गेलेला अक्षय अजून घरी आलेला नाही हे त्या वरून कळत होतं... पण मी त्याला call करून confirm केलं... आणि त्याचा टिफीन खाण्याची परवानगी पण मिळवली... नाहीतर 12:20 ला मला कोण Dinner घेऊन येणार होतं म्हणा... 8 वाजता येणारा हा टिफीन; 12 वाजे पर्यंत रूममेट्स पैकी कोणीही सहज उचलून ठेवणं शक्य होतं... आणि तसं झालं असतं तर मी तो शोधायला जाण शक्यच नव्हतं... कारण तो माझ्यासाठी आलेलाच नव्हता ना... तो तिथेच राहिला म्हणून... बरं झालं!!! Again one योगायोग… :D ;) :)

- Santosh Kudtarkar 24.09.2011 / 03:00 AM


 कार्यक्रमातील काही मी टिपलेली क्षणचित्रे -: (All rights to publish and copying the content is reserved to "Santosh_kudtarkar@yahoo.co.in | Photography")